Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:18
17 Iomraidhean Croise  

माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.


त्याने त्याचे प्रेत आपल्याच थडग्यात ठेवले आणि “अरेरे, माझ्या बंधो!” असे ओरडून लोकांनी त्याच्याबद्दल विलाप केला.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव जबूदा; ती रुमा येथला पदाया ह्याची कन्या.


त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरामूर्ती बाहेर काढली व यरुशलेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली, पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले.


यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.


योशीयाचे पुत्र : ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीया व चौथा शल्लूम.


यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका :


मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्‍यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही.


तर जेथे त्याला बंदिवान करून नेले आहे तेथेच तो मरेल; ह्या देशाचे दर्शन त्याला पुन्हा होणार नाही.”


तर स्वस्थपणे मरशील; तुझ्या पूर्वीचे राजे, तुझे पूर्वज ह्यांच्याकरता धूप वगैरे जाळत, तसे ते तुझ्याकरता जाळतील व ‘हायरे, माझ्या स्वामी!’ असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; कारण हे वचन मी बोललो आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


“ह्यास्तव यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास कोणी राहणार नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan