Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “जो आपले घर अधर्माने बांधतो, आपल्या माड्या अन्यायाने उभारतो, आपल्या शेजार्‍याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हायहाय करणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:13
16 Iomraidhean Croise  

मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.


मोबदला दिल्यावाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन,


जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.


तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्‍याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल.


ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत.


आपल्या शेजार्‍यावर जुलूम करू नकोस व त्याला लुबाडू नकोस. मजुराची मजुरी रात्रभर, दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.


तुम्ही रक्तपात करून सीयोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधता.


जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो त्याला धिक्कार असो!


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नकोस;


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan