Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र शल्लूम1 हा आपला बाप योशीया ह्याच्या जागी राजा होऊन ह्या ठिकाणाहून गेला, त्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “तो येथे कधी परत येणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:11
10 Iomraidhean Croise  

त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.


त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुशलेमेस पोहचवले; त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्याला मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले.


यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ही लिब्नाकर यिर्मया ह्याची कन्या.


मग फारो-नखो ह्याने योशीयाचा पुत्र एल्याकीम ह्याला त्याच्या बापाच्या जागी राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले; यहोआहाज मिसर देशाला गेल्यावर मरण पावला.


योशीयाचे पुत्र : ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीया व चौथा शल्लूम.


तेव्हा एफ्राइमातले कित्येक मुख्य-मुख्य पुरुष म्हणजे अजर्‍या बिन योहानान बरेख्या बिन मशिल्लेमोथ, यहिज्कीया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणार्‍यांना आडवे जाऊन म्हणाले,


मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत2 बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्‍या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले.


ज्या देशात परत येण्याची ते वांच्छा करतील त्यात ते परत येणार नाहीत.”


यहूदाचा राजा आमोन ह्याचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दित सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमर्‍या बिन हिज्कीया ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


Lean sinn:

Sanasan


Sanasan