Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्‍यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, कारण तो मायदेशी परत येणार नाही किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:10
19 Iomraidhean Croise  

तर पाहा, मी असे करीन की तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.”’ त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.


त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.


मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.


म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले.


नीतिमान नष्ट होतो, पण ते कोणी लक्षात घेत नाही; देवभक्त प्राणास मुकतात, पण अरिष्टामुळे नीतिमान प्राणास मुकतो हा विचार कोणी करत नाही.


मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्यांच्यासाठी भाकरी मोडणार नाहीत; कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्यापुढे प्याला करणार नाहीत.


यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र शल्लूम1 हा आपला बाप योशीया ह्याच्या जागी राजा होऊन ह्या ठिकाणाहून गेला, त्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “तो येथे कधी परत येणार नाही;


ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत.


ज्या देशात परत येण्याची ते वांच्छा करतील त्यात ते परत येणार नाहीत.”


“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’


यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”


“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.


“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.


येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan