यिर्मया 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “आमच्याकरता परमेश्वराला प्रश्न कर; बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आमच्याबरोबर लढाई करीत आहे. तो आमच्यापासून निघून जावा म्हणून परमेश्वर कदाचित आपल्या सर्व अद्भुत कृतींना अनुसरून आमच्याशी वर्तेल काय? असे विचार;” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “आम्हाला साहाय्य करावे, अशी विनंती याहवेहला कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आमच्यावर आक्रमण करणार आहे. याहवेह आमच्यावर कृपा करतील आणि प्राचीन काळी ते करीत असत तसा एखादा महान चमत्कार करून नबुखद्नेस्सरला सैन्य घेऊन परत जायला भाग पाडतील.” Faic an caibideil |
शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केलास?” शौल म्हणाला, “मी मोठ्या संकटात पडलो आहे; पलिष्टी माझ्याशी लढत आहेत, आणि देवाने माझा त्याग केला आहे, आता मला तो संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नांच्या द्वारे माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही; तेव्हा मी आता काय करावे ते तू मला सांगावेस म्हणून मी तुला बोलावले आहे.”