Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 21:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा. जो लूटलेला त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कोणीही विझवू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 21:12
46 Iomraidhean Croise  

दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.


मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.


देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्‍या सर्वांचा उच्छेद होईल.


दुसर्‍या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते.


चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?


‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


राग, संताप व क्रोध ह्यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वत: लढेन.


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्‍या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.


ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल,


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.


आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे;


कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्‍याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan