Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो. कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:8
26 Iomraidhean Croise  

तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, “अरे टकल्या, वर जा.”


पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


कोणाची तुम्ही चेष्टा करता? कोणाला तोंड विचकता? कोणाला जीभ काढून दाखवता? तुम्ही अधर्माची संतती, लबाडीचे बीज नाही काय?


अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.


हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.


पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’


हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.


माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.


मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.


तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”


‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.


तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या.


ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ [त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो.]


Lean sinn:

Sanasan


Sanasan