Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकांस कैद करून नेतील, आणि तू बाबेलास जाऊन मरशील, आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:6
25 Iomraidhean Croise  

वडील व सन्मान्य पुरुष हा शीर असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट.


मग मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, पाहा, संदेष्टे त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हांला दुष्काळ गाठणार नाही; तर ह्या स्थळी मी तुम्हांला खरी शांती देईन.”’


आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.


परमेश्वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपती इम्मेराचा पुत्र पशहूर ह्याने यिर्मया जो हा संदेश सांगत होता तो ऐकला.


परमेश्वर म्हणतो, पाहा, तू स्वत:ला व तुझ्या सर्व इष्टमित्रांना दहशत होशील, असे मी करीन; ते आपल्या शत्रूंच्या तलवारीने पडतील, हे तुझे डोळे पाहतील; बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहूदा देईन; तो त्यांना बंदिवान करून बाबेलास नेईल व तलवारीने वधील.


परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज ह्यांना शिक्षा करीन; ह्या लोकांत राहून त्याचे नाव घ्यायला त्याचे कोणी उरणार नाही; मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही. कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


तिचे संदेष्टे कच्चा चुना त्यांच्याकरता वापरतात; मिथ्या दृष्टान्त पाहून ते त्यांना खोटे शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर म्हणतो, असे ते बोलतात.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आईबाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहायचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत. तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आईबाप त्याला भोसकून मारतील.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan