Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सकाळी पशहूराने यिर्मयाला खोड्यांतून काढून बाहेर आणले, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला, “परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर-मिस्साबीब (चोहोकडे दहशत) ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पशहूरने जेव्हा दुसर्‍या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:3
18 Iomraidhean Croise  

मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल.


ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे.


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली.


मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.


जेथे खापर्‍या टाकतात त्या वेशीसमोरच्या बेन-हिन्नोम खोर्‍यात जा, तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर.


परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले.


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत लोक इत:पर त्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर ‘वधाचे खोरे’ म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील.


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.


आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan