Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे ह्याकरताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मी गर्भाशयातून बाहेरच का आलो, ही संकटे व दुःख बघण्यासाठी आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:18
27 Iomraidhean Croise  

तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.”


“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.


तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल!


विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते?


पण ठिणग्या वर उडतात तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो.


माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्‍यासारखी गळून गेली आहेत.


माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस; माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत.


पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.


हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.


अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.


मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?


आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”


हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.


“येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.


मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे.


मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.


ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan