Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही त्यांच्यासारखा तो मनुष्य होवो; सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:16
25 Iomraidhean Croise  

तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.


तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.


यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”


ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.


त्याच्या उजव्या बाजूस यरुशलेमेविषयी शकुन निघाला; तो असा की आघातयंत्रे लावावीत, ‘मारा! हाणा!’ असे शब्द तोंडातून काढावेत; सिंहनाद करावा, वेशींना आघातयंत्रे लावावीत; मोर्चे रचावेत व बुरूज बांधावेत.


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.


अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;


“देवाने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे; तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झालात; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.”


तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.


तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”


परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला.


तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील,


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


पुढे होणार्‍या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली;


त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan