Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तरी हे नीतिमानांचे सत्त्व पाहणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण तू सेनाधीश परमेश्वर, जो धार्मिकांची पारख करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पाहणाऱ्या, तर मग आता त्यांच्यावर तुझा सुड उगवताना मला पाहू दे, कारण तुझ्या समोर मी आपला वाद प्रकट केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता अंतःकरणाची व मनाची तपासणी करता, तुम्ही त्यांचा सूड घेतांना मला पाहू द्या, कारण मी माझी फिर्याद तुमच्यापुढे सादर केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:12
26 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”


परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.


हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.


तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे.


कारण त्याने मला सर्व संकटांतून सोडवले आहे; माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत.


सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल; दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल,


माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.


हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो.


हिज्कीयाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेवले.


निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.


तथापि हे सत्य न्याय करणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे.


माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.


ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan