Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील. ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत; म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत. ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील; आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:11
25 Iomraidhean Croise  

“माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.


कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.


माझे सर्व वैरी फजीत होतील व फार घाबरतील; ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील.


हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.


अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


ते सर्व लज्जित व फजीत झाले आहेत; एकंदरीने मूर्तिकारांची फजिती उडाली आहे.


पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.


तुला ह्या लोकांनांबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन; म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडवण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.


आणि तुम्हांला सर्वकाळचा कलंक लावीन; जिचा कधी विसर पडणार नाही अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.”


तू हजारांवर दया करतोस, बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस; थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे,


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan