Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील. कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तुम्हीही आपले स्थान सोडणार आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:37
16 Iomraidhean Croise  

दावीद उरीयाला म्हणाला, “आजही येथेच राहा; उद्या मी तुला रवाना करीन.” मग उरीया त्या दिवशी व दुसर्‍या दिवशीही यरुशलेमेत राहिला.


तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकूळ झाली आहे; म्हणून शेतकरी फजीत होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत.


परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


“लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.


परमेश्वर म्हणतो, “हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे, हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावायचा नाही; कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही.”


आणि तो सिद्कीयाला बाबेलास नेईल व मी त्याचा समाचार घेईन तोवर तो तेथे राहील, असे परमेश्वर म्हणतो; तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुमची सरशी होणार नाही?”


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan