Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस? अश्शूरविषयी जशी तू निराश झालीस, तशी तू मिसरविषयीही निराश होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 तुम्ही आपले मार्ग सोडून पथभ्रष्ट का होता? अश्शूरने तुमचा आशाभंग केला तसाच इजिप्तही करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:36
22 Iomraidhean Croise  

त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली.


ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील.


मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?


‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.


“लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.


वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल.


राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.


तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही, ह्याकरता तू अश्शूर्‍यांबरोबरही शिंदळकी केलीस; हो, त्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस तरीही तुझी तृप्ती होईना.


त्यांनी तुला हातांनी धरले तेव्हा तू चिडून त्या सर्वांचे खांदे फोडून टाकलेस; ते तुझ्यावर टेकले असता तू मोडून गेलास व तू सर्वांच्या कंबरा खचवल्यास.


यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan