Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रांत सापडले आहे; ते तुझे घर फोडताना तुझ्या हाती लागले नाहीत, तर ह्या सर्वांना तुझे वर्तन कारण झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:34
22 Iomraidhean Croise  

मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.


त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करीना.


एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.


चोर घर फोडत असता सापडला व ठार मरेपर्यंत त्याला मार बसला, तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर यायचा नाही;


प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता, ओढ्यांतल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही?


कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते.


त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.


त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानले आहे; त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे ह्यांना जे माहीत नव्हते अशा अन्य देवांपुढे त्यांनी धूप जाळला; निर्दोष्यांच्या रक्ताने ते स्थान भरले;


तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.


परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही,


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.


आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाहीच.


तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्‍या, गर्जणार्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात.


तथापि नीतिमान लोक जारिणींचा व खुनी स्त्रियांचा न्याय करतात तसा त्यांचा करतील; कारण त्या जारिणी आहेत व त्यांच्या हातांना रक्त लागले आहे.”


कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे; धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही.


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan