Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:31
26 Iomraidhean Croise  

फारो त्याला म्हणाला, “तू माझ्याजवळ असता तुला काय उणे आहे? तू स्वदेशी का जाऊ पाहतोस?” तो फारोला म्हणाला, “काही नाही; पण माझी रवानगी कराच.”


तेव्हा सादोक घराण्यातला अजर्‍या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”


हेच लोक देवाला म्हणत असत की, ‘आमच्यापासून दूर हो; तुझ्या मार्गाची ओळख आम्हांला नको;


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?”


माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.


मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे.


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’


ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.


ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.


येणेकरून मी इस्राएल घराण्याच्या हृदयास हात घालीन, कारण ते सर्व आपल्या मूर्तींमुळे मला परके झाले आहेत.


जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.


तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्‍या देवाला तू विसरलास.


Lean sinn:

Sanasan


Sanasan