Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ. जो कोणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:3
32 Iomraidhean Croise  

आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.


पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.


हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


तुम्ही हे आपल्या मुलाबाळांना कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे.


“सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्‍चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो!


शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.


जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.


ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :


सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथमउपज लोक परमेश्वराला अर्पण करतील तो मी तुला दिला आहे.


कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.


जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे.


त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.


कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.


म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”


कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे.


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan