Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तर तुम्ही माझ्याशी का वाद घालता? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 “तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:29
8 Iomraidhean Croise  

‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.


सर्व इस्राएल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; त्यांनी पराङ्मुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही; म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे; देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे. कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे.


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan