Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 चोराला पकडले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्राएलाचे घराणे लज्जित झाले आहे; ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:26
18 Iomraidhean Croise  

आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे.


जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.


तुमच्या आवडीची जी एलाची झाडे त्यांविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्यासंबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल.


पाहा, त्याचे सर्व अनुयायी फजीत होतील; ही मूर्ती घडवणारे माणसेच आहेत; ते सर्व एकत्र जमोत, पुढे येवोत, भयभीत होवोत, ते सारे लज्जित होवोत.


कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.


इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज म्हणजे ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे, यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांनी मला चिडवावे म्हणून जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे मी असे करीन.


“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”


इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.


म्हणजे तुला लज्जेचा काळिमा लागेल, ज्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्यांविषयी तू लज्जित होशील.


तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan