Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तर तू आपणांस खाराने धुतले व आपणास पुष्कळसा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जरी तू स्वत:ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले, तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:22
12 Iomraidhean Croise  

दावीद उरीयाला म्हणाला, “आजही येथेच राहा; उद्या मी तुला रवाना करीन.” मग उरीया त्या दिवशी व दुसर्‍या दिवशीही यरुशलेमेत राहिला.


माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहेस; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवतोस.


हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?


तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत; आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत.


कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.


“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत.


एफ्राइमाच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेवले आहे, त्याचे पाप जमवून ठेवले आहे.


परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, “मी त्यांची कोणतीही कर्मे खातरीने कधीही विसरणार नाही.


‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan