Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:21
27 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


त्याचा सेवक अब्राहाम ह्याचे वंशजहो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशजहो, तुम्ही असे करा.


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.


तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला.


तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे.


साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.


“त्या दिवशी द्राक्षांच्या मळ्याविषयी गीत गा.


माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना,


माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या.


इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”


तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.


सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.


“मानवपुत्रा, सर्व वृक्षांत द्राक्षलतेची काय श्रेष्ठता आहे? वनवृक्षांमध्ये जी द्राक्षांची फांदी होती ती काय अधिक आहे?


आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला.


मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला.


मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्‍यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला.


मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.


त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेपासून निघाली आहे, ती गमोर्‍यांच्या मळ्यातली आहे, त्यांची द्राक्षे विषारी आहेत; त्यांचे घोस कडू आहेत.


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan