Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:2
39 Iomraidhean Croise  

आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;”


परमेश्वराने मिसर्‍यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्याच्यावर विश्वास ठेवला.


मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.”


ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते;


सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलमोन राजाला पाहा; त्याच्या विवाहदिवशी, त्याच्या मनाला उल्लास झाला त्या दिवशी, त्याच्या मातेने त्याला घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला, असा हा पाहा.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग : ह्या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा.


जेथे खापर्‍या टाकतात त्या वेशीसमोरच्या बेन-हिन्नोम खोर्‍यात जा, तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर.


तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’


‘माझ्या बापा, माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस’, असे तू आतापासून मला म्हणणार नाहीस काय?


“परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.


ही सर्व अमंगळ कृत्ये व शिंदळक्या करताना तू लहानपणी उघडीनागडी असून आपल्या रक्तात लोळत होतीस ह्याची तुला कधी आठवण झाली नाही.


तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार करीन.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


तरी तिने आपल्या तारुण्यात मिसर देशात वेश्यावृत्ती चालवली होती. तिची तिला आठवण होऊन तिने आपला व्यभिचार अधिकच वाढवला.


त्यांनी मिसर देशात व्यभिचार केला; त्यांनी आपल्या तारुण्यात व्यभिचार केला; तेथे त्यांची स्तने मर्दण्यात आली; पुरुषांनी त्यांच्या कौमार्यावस्थेतील त्यांची स्तनाग्रे चुरली.


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.


कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही.


ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.


“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”


ज्याला कान आहेत तो ऐको.


लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”


कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’


तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan