Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आणले नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:17
28 Iomraidhean Croise  

हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


कारण त्याला अनुसरण्याचे सोडून त्याचा कोणताही मार्ग त्यांनी ध्यानात आणला नाही.


माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.


वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.


ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.


जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते; जो वाग्दंडाचा तिटकारा करतो तो मरेल.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानले आहे; त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे ह्यांना जे माहीत नव्हते अशा अन्य देवांपुढे त्यांनी धूप जाळला; निर्दोष्यांच्या रक्ताने ते स्थान भरले;


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तुझे वर्तन व तुझी कर्मे ह्यांमुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे; तुझ्या हृदयास ती भिडली आहे.”


त्यांनी जाऊन धूप जाळला व त्यांना, तुम्हांला व तुमच्या वडिलांनाही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली; असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडवले म्हणून असे झाले.


तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.


त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे, त्यांच्या अपराधांप्रमाणे, मी त्यांच्याबरोबर वर्तलो आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवले.


हे इस्राएला, जो मी तुझा साहाय्यकर्ता त्या माझ्यावर तू उलटलास, त्यामुळे तुझा नाश झाला.


याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएल घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?


असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा.


तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.


हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan