Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:16
17 Iomraidhean Croise  

पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात त्यांना तो असाच आहे.


यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल.


पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत; कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघून मवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकत आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


मी मिसरास आग लावीन; सीन वेणा देईल; नो छिन्नभिन्न होईल, नोफावर तर भरदिवसा वैरी उठतील.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


गादाविषयी तो म्हणाला, ‘गादाचा विस्तार करणारा तो धन्य; तो सिंहासारखा बसतो, तो बाहू व मस्तक फोडतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan