Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:10
21 Iomraidhean Croise  

इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत : नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम,


तेव्हा लोक म्हणतील, ‘त्यांचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले असून ते त्याला सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजनपूजन व उपासना करू लागले, ह्यांमुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्यांच्यावर आणली आहे.”’


यावानाचे पुत्र : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला इस्राएलावर राजा नेमले. लेवी आणि याजक ह्यांची विभागणी व त्यांची कामे


कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;


हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्‍यांजवळ राहतो.


कारण प्रभूने मला असे सांगितले आहे की, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे एका वर्षाच्या मुदतीत केदाराचे सर्व वैभव लयास जाईल;


सोराविषयीची देववाणी : तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.


तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.


अरबस्तान व केदारचे सर्व सरदार व्यापारासंबंधाने तुझ्या मुठीतले असत; कोकरे, एडके व बोकड ह्यांचा ते तुझ्याबरोबर सौदा करत.


त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली; तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातल्या अश्शूरी (बाक्स) लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या.


ह्यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा अधिक बंडाळी माजवली व माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय पाळले नाहीत, आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणेदेखील वागला नाहीत,


नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.


कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्‍यांबरोबर स्नेह करू पाहील.


तरी कित्ती ह्यांच्या किनार्‍यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


ते तुकडे घेऊन जाणार्‍या लोकांना तो म्हणाला, “तुम्ही सगळ्या इस्राएल लोकांना विचारा, इस्राएल लोक मिसरातून आल्या दिवसापासून आजपर्यंत असे कृत्य घडल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? ह्यावर विचार करा आणि आपले मत सांगा.” (ते पाहणार्‍या सर्वांनी उद्‍गार काढले, “तेव्हापासून तर आतापर्यंत असले कृत्य घडल्याचे कोणी पाहिले नाही.”)


Lean sinn:

Sanasan


Sanasan