यिर्मया 19:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
15 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”
15 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो: पाहा! मी यरूशलेमेवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर सर्व अरिष्ट जे मी बोललो ते आणीन. कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”
15 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ”
त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.
त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.
इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”
इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’
असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील.
“यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही.
मी त्याला, त्याच्या संततीला व त्याच्या सेवकांना त्यांच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा करीन आणि ते, यरुशलेमनिवासी व यहूदाचे लोक ह्यांच्यावर जे अरिष्ट आणीन म्हणून मी बोललो ते सर्व त्यांच्यावर आणीन, पण त्यांनी माझे ऐकले नाही.”’
हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.
अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.
प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.