Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 ‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:13
19 Iomraidhean Croise  

त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.


आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहूदाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनश्शेने परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत ज्या वेद्या केल्या होत्या, त्या राजाने मोडूनतोडून टाकल्या आणि त्यांची धूळमाती त्याने किद्रोन ओहोळात फेकून दिली.


त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरामूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली.


त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे; तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.


हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत.


दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?


परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी ह्यांचे असे करीन.


आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील.


पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले तेव्हापासून आम्हांला सर्व गोष्टींची वाण पडली, आणि तलवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे.”


त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


मुलेबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवतात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांना पेयार्पणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणीक तिंबतात; असे ते मला क्रोधास पेटवतात.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


ते दुसर्‍या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला.


तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय?


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan