Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:11
13 Iomraidhean Croise  

लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”


ह्यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही.


कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी ह्यांचे असे करीन.


परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


मवाबाच्या सर्व धाब्यांवर, त्याच्या सर्व चव्हाट्यांवर चोहोकडे शोक चालू आहे; कारण नापसंत पात्राप्रमाणे मी मवाबाचा फोडून चुरा केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे;


शुद्ध सुवर्णतुल्य सीयोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभारांच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात!


त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’


‘आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील;’


Lean sinn:

Sanasan


Sanasan