Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 एखाद्यावेळी मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलेल, ते बाहर काढने, फाडून टाकने किंवा नाश करणे असे बोलेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 एखाद्या राष्ट्राचा भेद पाडावा, त्याचे निर्मूलन करावे, व समूळ नाश करावा, असे जेव्हा मी जाहीर करतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:7
13 Iomraidhean Croise  

म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांतला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल.


आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.


ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, ‘तू मरशीलच,’ आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील;


तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.


पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा ह्या पापिष्ट राज्यावर आहे; मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन; याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही,” असे परमेश्वर म्हणतो.


देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.


योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan