Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:21
27 Iomraidhean Croise  

त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.


तलवारीने त्यांचा निःपात होईल; ते कोल्ह्यांचे खाद्य होतील.


राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्‍यांचे तोंड बंद होईल.


आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील.


त्यांची धनुष्ये तरुणांना पाडतील; ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत; त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत.


ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस; वधायला न्यायच्या मेंढरांसारखे त्यांना बाहेर काढ; वधाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध कर.


आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.


मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.


माझ्यासमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत; मी भरदुपारी त्यांच्यावर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो; तिच्यावर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करतो.


ह्यामुळे त्यांचे तरुण त्याच्या चवाठ्यावर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो.


कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.


जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन.


तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्‍या, गर्जणार्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.


आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’


शमुवेल त्याला म्हणाला, “तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत, त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे तुकडे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan