Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो आणि त्यांच्यावतीने बोललो जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:20
31 Iomraidhean Croise  

तुम्ही तर पोरक्यावर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांचा क्रयविक्रय करण्यास चुकत नाही.


तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.


दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन.


मी केलेल्या बर्‍याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे.


कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली.


जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बर्‍याची फेड वाइटाने करणारे मला विरोध करतात.


माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. (सेला)


त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला.


जो बर्‍याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.


जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.


जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.


ह्याकरता तू ह्या राष्ट्रांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी विनंती करू नकोस की धावा करू नकोस; कारण ते आपल्या संकटसमयी मला हाक मारतील तेव्हा मी ऐकणार नाही.


हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याबरोबर झगडणार्‍यांची वाणी ऐक.


तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.


ते जर संदेष्टे असले व परमेश्वराचे वचन त्यांच्याजवळ असले तर परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत जी पात्रे उरली आहेत ती बाबेलास जाऊ नयेत अशी त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करून पाहावी.


कारण माझ्या लोकांमध्ये दुष्ट जन आढळतात, ते फासेपारध्याप्रमाणे दबा धरतात; ते सापळा मांडून माणसांना धरतात.


ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही.


हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर.


येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”


तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.


योनाथानाने आपला बाप शौल ह्याच्याकडे दाविदाची प्रशंसा करून म्हटले की, “राजाने आपला दास दावीद ह्याच्याविरुद्ध अपराध करू नये. कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan