Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा ते लोक म्हणाले, “या आपण यिर्मयाविरूद्ध योजना करु, कारण याजकापासून नियमशास्त्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला, आणि संदेष्ट्यांपासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्यास शब्दांचा मारा देऊ, आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:18
37 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.


तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला, आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?”


मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला.


तो शहाण्यांस त्यांच्याच धूर्ततेने धरतो; कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करतो.


कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही,


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.


जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.


ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.


तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’


हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याबरोबर झगडणार्‍यांची वाणी ऐक.


‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


तेव्हा याजक व संदेष्टे सरदारांना व सर्व लोकांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण ह्या नगराविरुद्ध ह्याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे.”


तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्‍यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”


तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;


“तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही.


आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.


‘आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे नियमशास्त्र आमच्याजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पाहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे.


माझ्यावर उठणार्‍यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”


ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”


परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan