Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पूर्वेकडील वार्‍याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी त्यांना पूर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यांपुढे उडवीन. त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही तर पाठ दाखवीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:17
16 Iomraidhean Croise  

पूर्वेचा वारा त्याला उडवून नेतो. आणि तो नाहीसा होतो. त्याचा सपाटा त्याला त्याच्या स्थानावरून काढून टाकतो.


पूर्वेच्या वार्‍याने तार्शीशची गलबते तू फोडतोस.


कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.


ह्यास्तव रानातल्या वार्‍यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन.


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.


तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.


तुझ्या वल्हेकर्‍यांनी तुला खोल पाण्यात नेले, पूर्वेच्या वार्‍याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.


मी आपले तोंड त्यांच्यापासून फिरवीन म्हणजे ते लोक माझे भांडार भ्रष्ट करतील; लुटारू त्यात शिरून ते भ्रष्ट करतील.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan