Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रांमध्ये चौकशी करून पाहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय? इस्राएलाच्या कुमारीने अति घोर कर्म केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यास्तव परमेश्वर असे म्हणतो: दुसऱ्या राष्ट्रांना विचारा, या अशा गोष्टी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? इस्राएलाच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून याहवेह असे म्हणतात: “आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा: असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय? इस्राएलाच्या कुमारिकेने एवढे भयंकर कर्म केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:13
14 Iomraidhean Croise  

मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.


अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली.


तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.


लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय?


यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”


हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.


चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे.


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.


हे इस्राएलाच्या घराण्या, हे जे विलापवचन मी तुमच्याविरुद्ध उच्चारतो ते ऐका :


“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, “देव छावणीत आला आहे; हायहाय, आता आमचे काय होईल! अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan