Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण ते म्हणतात, आशा नाही, यास्तव आपण आपल्या योजनांनुसार कार्य करूया. आम्ही प्रत्येक आपल्या दुष्ट हृदयाच्या इच्छेप्रमाणे वागू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु त्यांनी उत्तर दिले, ‘हे उपयोगाचे नाही. आम्ही आमच्या आखलेल्या योजनेप्रमाणे करीत राहू; आम्ही आमच्या हृदयाच्या हट्टीपणा व दुष्टपणानेच चालणार.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:12
18 Iomraidhean Croise  

पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”


दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही.


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.”


तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे; कारण पाहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही.


आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे; ह्यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत.


आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.


मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’


तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


तुम्ही म्हणालात, ‘देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो ह्यांपासून लाभ काय?


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan