Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:4
34 Iomraidhean Croise  

जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील.


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.


ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल,


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


जे तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही कोलिते वागवता ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा! तुम्ही स्वतः पेटवलेल्या कोलितांत जाऊन पडा! माझ्या हातून हे तुम्हांला घडेल; तुम्ही क्लेशात पडून राहाल.


ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”


“मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.


तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुमच्याविरुद्ध पेटला आहे.”


ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’


हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.


इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे?


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?


जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’


परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?”


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


“येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan