Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:3
23 Iomraidhean Croise  

मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले; शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते.


त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


“तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन.


नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मोलवान वस्तू व यहूदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन, आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील.


“परमेश्वर म्हणतो, अगे खोर्‍यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे.


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


वैर्‍याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.


मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यावर लोकांचा जमाव आणून त्यांना दहशत पडेल व त्यांना लुटतील असे करीन.


असे म्हण : इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर पर्वत, टेकड्या, नाले व खोरी ह्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच तुमच्यावर तलवार आणून तुमची उच्च स्थाने उद्ध्वस्त करीन.


तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील; ते घरे बांधतील, पण त्यांत वसणार नाहीत; द्राक्षीचे मळे लावतील, पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan