Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:27
43 Iomraidhean Croise  

कारण ह्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून ह्या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही.


त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथील वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.


तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.”


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


तथापि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे मनापासून ऐकून शब्बाथ दिवशी ह्या नगराच्या वेशींतून काही ओझे आणणार-नेणार नाही आणि शब्बाथ दिवशी काही कामधंदा न करता तो पवित्रपणे पाळाल,


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल.


आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील.


खास्दी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकला.


“तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही.


मी दिमिष्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन, तो बेन-हदादाचे वाडे खाऊन टाकील.”


त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


ते तुझी घरे अग्नीने जाळतील आणि बहुत स्त्रियांदेखत तुला शासन करतील; ह्या प्रकारे तुझी शिंदळकी मी बंद करीन, आणि ह्यापुढे तू कोणाला वेतन देणार नाहीस.


त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.


इस्राएल देशास सांग, परमेश्वर असे म्हणतो की पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, मी आपली तलवार म्यानातून उपसून तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकीन.


तू माझ्या पवित्र वस्तूंना तुच्छ लेखतेस, तू माझे शब्बाथ अपवित्र लेखले आहेत.


त्यांनी आणखी माझ्याबरोबर हेही वर्तन केले आहे की, त्यांनी त्याच दिवशी माझे पवित्रस्थान अपवित्र केले आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले.


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील.”


ह्यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्राचे महाल जाळून भस्म करील.”


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


पण मी हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन; तो बेन-हदाद ह्याचे महाल जाळून भस्म करील.


तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील.


त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan