Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:26
17 Iomraidhean Croise  

“परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.


ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.


मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.


मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन;


तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;


त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


डोंगरवटीतल्या शहरांत, मैदानांतल्या शहरांत, दक्षिणेतल्या शहरांत, बन्यामिनाच्या प्रांतांत, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत आणि यहूदाच्या नगरांत मोजदाद करणार्‍याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.


यरुशलेम वसलेले व आबादीआबाद होते आणि त्याच्या सभोवतालची गावे, तसेच दक्षिणदेश व तळवट ह्यांत वस्ती होती तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हत काय?”


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


Lean sinn:

Sanasan


Sanasan