Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:16
21 Iomraidhean Croise  

तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस; वधायला न्यायच्या मेंढरांसारखे त्यांना बाहेर काढ; वधाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध कर.


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.


बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.


हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.


वेशीत हितबोध करणार्‍यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्‍याचा वीट मानतात.


जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही.


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan