यिर्मया 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
7 मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्यांच्यासाठी भाकरी मोडणार नाहीत; कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्यापुढे प्याला करणार नाहीत.
7 मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
7 शोक करणार्यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.
मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली.
मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.
मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही.
तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”
ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत; त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत; त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल; ते खाणारे सर्व अशुद्ध होतील; त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरताच आहे; परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत.
मी सुतकी असताना ह्यांतले काही खाल्ले नाही, अथवा अशुद्ध असताना ह्यांतले काही काढून टाकले नाही, अथवा मृतांसाठी त्यांतले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे; मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे.