Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “ते रोगग्रस्त मृत्यू मरतील, त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही आणि त्यांना पुरले जाणार नाही. ते शेणखताप्रमाणे जमिनीवर असतील. कारण ते लोक तलवारीने आणि उपासमारीने नष्ट होतील. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व भूमीवरील प्राण्यांस आहार असे होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:4
33 Iomraidhean Croise  

इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरायला कोणी असणार नाही.” मग दार उघडून त्याने पळ काढला.


त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


डोंगरांवरील अधाशी पक्ष्यांसाठी व देशातील गुराढोरांसाठी त्या सर्व पडून राहतील; त्यांवर अधाशी पक्षी उन्हाळा काढतील आणि देशातील सर्व गुरेढोरे हिवाळा काढतील.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


ह्या नगरात राहणारी माणसे व पशू ह्यांना मी मारीन; ती मोठ्या मरीने मरतील.


त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.


त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन. म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


“ह्यास्तव यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास कोणी राहणार नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.


मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्‍चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.


पाहा, त्यांचे अभीष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन; आणि मिसर देशात असलेल्या यहूदातल्या सर्व लोकांचा अंत होईपर्यंत ते दुष्काळाने व तलवारीने क्षय पावतील.


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्‍याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’


क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण1 तांबेरा व बुरशी ह्यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील.


तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकायला कोणी असणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan