यिर्मया 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे. जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही. Faic an caibideil |