Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:18
24 Iomraidhean Croise  

त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली.


पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.


पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला.


मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.


कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


ते येथे येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तू येथून काढून टाकतील.


तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan