Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांस मासे धरल्यासारखे पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:16
21 Iomraidhean Croise  

तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.


त्या सगळ्या येऊन खडकाळ खोर्‍यांत, खडकांच्या कपारींत, सगळ्या काटेरी झुडपांत व सर्व कुरणांत उतरतील.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही.


प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्‍यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.”


ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात म्हणून आम्हांला आमच्या आळ्यांत फिरवत नाही; आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत; आमचा अंत आलाच आहे.


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


मला वाटेल तेव्हा मी त्यांना शासन करीन; त्यांना त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्याविरुद्ध राष्ट्रे गोळा होतील.


प्रभू परमेश्वराने आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, “पाहा, असे दिवस तुम्हांला येत आहेत की तुम्हांला आकड्यांनी ओढून नेतील; शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.


एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तर त्याला अस्वल गाठते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तर त्याला सर्प दंश करतो, तसा हा प्रकार आहे.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


तर आता परमेश्वराच्या दृष्टिवेगळे माझे रक्त भूमीवर न पडो; डोंगरात कोणी तितराची शिकार करावी तसा इस्राएलाचा राजा एक पिसू धुंडायला निघाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan