Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, ‘परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्याविरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:10
11 Iomraidhean Croise  

इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.


त्यांनी जाऊन धूप जाळला व त्यांना, तुम्हांला व तुमच्या वडिलांनाही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली; असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडवले म्हणून असे झाले.


जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan