Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:6
28 Iomraidhean Croise  

किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे; त्यांच्या ह्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फर्मावीन.


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आणले नाही काय?


तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.


त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्‍यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो.


अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.


ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही.


तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.


मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.


शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


म्हणून पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशांमधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.


त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.


कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.


“मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;


पण ते ऐकेनात, त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan