Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? तुझ्यासाठी कोण शोक करेल? तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:5
15 Iomraidhean Croise  

माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा हो, दया करा; कारण देवाचा हात माझ्यावर पडला आहे.


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


कारण परमेश्वर म्हणतो की : शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


सीयोनेने आपले हात पसरले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; परमेश्वराने याकोबासंबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैर्‍यांनी त्याला घेरले आहे; यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुचि झाली आहे.


आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?


ते तिकडे वळले आणि मीखाच्या घरी राहणार्‍या तरुण लेवीच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले.


ते तुला सलाम करतील. तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे.


दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्‍यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले.


तेव्हा दाविदाने दहा तरुण पुरुषांना तेथे पाठवले; त्याने त्या तरुणांना सांगितले की, “कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan