Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील. जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील. लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 म्हणून याहवेहने असे म्हणतात: “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन म्हणजे तू माझी सेवा करशील; जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, परंतु तू त्यांच्याकडे वळू नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:19
34 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.”


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.”


“परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस,


भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही.


तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”


ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत.


तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.


त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.


ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा;


ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे शिकवण्यासंबंधीचा हा महारोगाविषयीचा नियम होय.”


“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्‍यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.


देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे.


जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”


कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही.


पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan